Aditya Thackeray : SCच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'हा धक्का नाहीये..' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aditya Thackeray

SCच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'हा धक्का नाहीये..'

नवी दिल्ली : शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या कामकाजाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे. यामुळं शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्यास निवडणूक आयोग घेऊ शकणार आहे. हा शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. दरम्यान शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आजचा निर्णय म्हणजे शिंदे गटाला दिलासा नाही अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. (Aditya Thackeray on Supreme Court decision on shiv sena party symbol maharashtra politics)

जेथे सुनावणी होईल तेथे आम्ही तयार आहोत, न्यायप्रक्रियेवर आमचा विश्वास आहे. युक्तीवाद हा लढा आहे हा लोकशाहीसाठी महत्वाचा ठरेल असे आदित्य ठाकरे म्हणाले. आमचा विश्वास संविधान, लोकशाही आणि न्यायदेवतेवर आहे आणि आम्ही सत्याच्या बाजूने आहोत आणि सत्यासाठी लढत राहू असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.

हेही वाचा: Navratri : शिंदे सरकारचा मोठा निर्णय! नवरात्रीत रात्री १२ वाजेपर्यंत खेळता येणार गरबा

कोर्टाचा आजचा निर्णय हा शिवसेनेला धक्का वाटत असेल पण हा धक्का किंवा दिलासा नाहीये. हा युक्तीवाद आहे, त्याचं कोर्ट बदललेलं आहे. प्रकरण सुप्रीम कोर्टाकडून इलेक्शन कमिशनकडे गेलेलं आहे. शिंदे गटाकडून कोर्टाच्या निर्णयानंतर जल्लोष केल्याबाबत विचारले असता उध्दव ठाकरेंनी राजीनामा दिला तेव्हा देखील हे गद्दार लोकं टेबलावर चढून नाचले होते. त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा नाही, आम्ही लढत राहू असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

हेही वाचा: Jio Phone 5G: 'जिओ'च्या पहिल्या 5G फोनची किंमत उघड! 'या' फीचर्ससह होणार लॉंच

सुप्रीम कोर्टात आज सकाळपासून शिवसेनेबाबतच्या विविध याचिकांवर पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरु होती. या सुनावणीत शेवटी कोर्टानं निवडणूक आयोगाच्या कामकाजात ढवळाढवळ करणार नसल्याचं म्हटलं आहे. यामध्ये सुप्रीम कोर्टानं दोन प्रकारचे थेट आदेश दिले आहेत. यामध्ये कोर्टानं मूळ शिवसेनेचा अर्ज फेटाळला असून शिंदे गटाचा अर्ज स्विकारला आहे.