Navratri : शिंदे सरकारचा मोठा निर्णय! नवरात्रीत रात्री १२ वाजेपर्यंत खेळता येणार गरबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cm eknath Shinde govt permitted use of loudspeakers till 12 pm during the last three days of Navratri

Navratri : शिंदे सरकारचा मोठा निर्णय! नवरात्रीत रात्री १२ वाजेपर्यंत खेळता येणार गरबा

मुंबई : यावर्षी नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. भाविकांना यंदा उत्सवाचे शेवटचे तीन दिवस रात्री १२ वाजेपर्यंत गरबासाठी मुभा मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वनीक्षेपक वापरास वाढीव दिवसाची सूट देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १, ३ आणि ४ ऑक्टोबरला सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरता येणार आहे. तसेच मुंबईमध्ये यंदा नवरात्रौत्सवासाठी ३ व ४ ऑक्टोबर व्यतिरिक्त १ ऑक्टोबर हा आणखी एक वाढीव दिवस उपलब्ध होणार.

सरकारकडून रात्री १२ वाजेपर्यंत गरबा खेळण्यास परवानगी दिली आहे, यापूर्वी ती वेळ रात्री १० वाजेपर्यंत होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. तसेच मुंबईमध्ये यंदा ३ व ४ ऑक्टोबर व्यतिरिक्त १ ऑक्टोबर हा आणखी एक वाढीव दिवस उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा: Jio Phone 5G: 'जिओ'च्या पहिल्या 5G फोनची किंमत उघड! 'या' फीचर्ससह होणार लॉंच