Vidhan Sabha 2019 : आदित्य ठाकरे म्हणतात, 'शरद पवार यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं'

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 October 2019

शरद पवारांनी भरपावसात साताऱ्यातील सभेत केलेले भाषण चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांचाच कित्ता गिरवत भरपावसात प्रचार रॅली काढणाऱ्या युवासेनाप्रमुख आणि वरळी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरेंनीही शरद पवार यांचे कौतुक केले.

मुंबई : शरद पवारांनी भरपावसात साताऱ्यातील सभेत केलेले भाषण चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांचाच कित्ता गिरवत भरपावसात प्रचार रॅली काढणाऱ्या युवासेनाप्रमुख आणि वरळी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरेंनीही शरद पवार यांचे कौतुक केले. शरद पवारांकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. 

विधानसभा निवडणूक प्रचाराचा शेवटच्या दोन दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे पावसात प्रचार रॅली किंवा सभा घेण्याशिवाय पर्याय नव्हता. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आदित्य ठाकरेंनी भरपावसात धारावी मतदारसंघात रोड शो केला.

"मी शरद पवारांवर कधीच वैयक्तिक टीका केली नाही, त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. ते माझ्या आजोबांचे मित्र आहेत, काल त्यांनी भरपावसात भिजून जे काही केलं, ते खरंच सगळ्यांनी कौतुक करण्यासारखे आहे' अस म्हणत आदित्य ठाकरेंनी पवारांच्या या वयातील कार्याचं कौतुक केलं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aditya Thackeray Praising NCP Chief Sharad Pawar Maharashtra Vidhan Sabha 2019