'मनसे ही भाजपची सी टीम तर MIM..'; आदित्य ठाकरेंचे राज ठकरेंवर टिकास्त्र

Aditya Thackeray
Aditya Thackeray sakal media

राज ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथे गुढी पाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकेनंतर अनेक नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर टिकेची झोड उठवली आहे. यातच आता शिवसेनेचे नेत आदित्य ठाकरे यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी मनसे भाजपची सी टीम असल्याचा आरोप केला आहे. ते सामला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

अजान विरोधात हनुमान चालीसा हे नरेटीव्ह भाजप पुढं करतंय त्याविषयी विचारले असता आदित्य ठाकरे यांनी हिंदुत्वा विषयी बोलताना मनसे आणि भाजपवर टिका केली. त्यांनी मनसे ही भाजपची सी टीम तर MIM ही भाजपची टीम बी असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, "आमचं हिंदुत्व हे लोकांना दिलेली वचन पुर्ण करण्याचं आहे. ज्या पक्षांचा तुम्ही उल्लेख केल्यात त्यांना आधी मी टाईमपास टोळी म्हणायचो. आता त्यांना भाजपची सी टीम म्हणून त्यांना थोडं काम मिळालं आहे. बी टीम ही एमआयएम आहे आणि सी टीम मनसे." असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Aditya Thackeray
"शरद पवारांचे नाव घेतले की…"; राज ठाकरेंच्या टिकेवर आव्हाडांचे प्रत्युत्तर

दरम्यान सध्या अजान विरोधात हनुमान चालीसा हे नरेटीव्ह भाजप पुढं करतंय त्याविषयी विचारले असता, ते म्हणाले की "आमचं हिंदुत्व हे लोकांना दिलेली वचन पुर्ण करण्याचं आहे. ज्या पक्षांचा तुम्ही उल्लेख केलात त्यांना आधी मी टाईमपास टोळी म्हणायचो. आता त्यांना भाजपची सी टीम म्हणून त्यांना थोडं काम मिळालं आहे. बी टीम ही एमआयएम आहे आणि सी टीम मनसे." असं आदित्य ठाकरे म्हणाले.

"भाजपला ज्या-ज्या राज्यामध्ये राजकारण करायचं असेल हे या दोन्ही पक्षांना वापरुन किंवा काहीना काही बोलून, काहीतरी घटना घडवून हिंदू मुस्लीम दंगे करुन स्वतः सरकार कसे स्थापन करायचं यावर त्यांचे लक्ष आहे. ते कालच्या याच्यातून दिसतंय" असे ते म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, "जो पक्ष एवढे वर्ष भूमिका स्पष्ट करु शकले नाहीत त्याच्याकडं आपण किती लक्ष द्यायचं, याची काळजी महाराष्ट्राने घेणे गरजेचे आहे, राज्याने लक्ष ठेवावं वाद विवाद वाढू नये. हिंदूत्वासाठी सतत लढण्य़ाची गरज नसते. हिंदूत्व म्हणजे आपण राजकीय पक्ष म्हणून जी वचनं देतो ती जरी पुर्ण करुन दाखवली तरी ते हिंदूत्व आहे" असे ते म्हणाले.

Aditya Thackeray
नाशिकजवळ रेल्वेचे डबे रुळावरुन घसरले; एक ठार, 5 प्रवासी जखमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com