esakal | दहावी परीक्षा रद्द झाल्याने अकरावी प्रवेशाला येणार 'अच्छे दिन'; जाणून घ्या राज्यातील विभागनिहाय जागा

बोलून बातमी शोधा

students
दहावी परीक्षा रद्द झाल्याने अकरावी प्रवेशाला येणार 'अच्छे दिन'; जाणून घ्या राज्यातील विभागनिहाय जागा
sakal_logo
By
मंगेश गोमासे

नागपूर : राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अकरावीतीळ रिक्त जागांची संख्या बऱ्यापैकी घटणार असून कनिष्ठ महाविद्यालयांना ‘अच्छे दिन’ येणार आहेत.

हेही वाचा: शेवटचं मंगलाष्टक सुरु असताना अचानक झाली 'त्यांची' एंट्री; लग्नमंडपात उडाली तारांबळ; अखेर...

राज्यात दहावीच्या परीक्षा २९ एप्रिलपासून सुरू होणार होत्या. त्यासाठी राज्यातून १६ लाखांवर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र, राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. संपूर्ण राज्यात रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता तज्ज्ञ समिती विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करावे याबाबत विचार करीत आहे.

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दहावीच्या निकाल ९३ ते ९७ टक्क्यांपर्यंत लागतो. यामध्ये कोकण प्रथम क्रमांकावर असते. याशिवाय सीबीएसईनेही दहावीची परीक्षा न घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे तेही राज्य बोर्डात प्रवेश घेत असल्याचे दिसून येते. असे असतानाही अकरावी प्रवेशात किमान ४० टक्के जागा रिक्त असल्याचे दिसते. गेल्यावर्षी राज्यातील ५ लाख ४३ हजार ७८५ जागांपैकी ३ लाख ६६ हजार ६३७ जागांवर प्रवेश देण्यात आले. मात्र, राज्यात विविध महाविद्यालयातील १ लाख ७७ हजार १९८ जागा रिक्त राहिल्या. बऱ्याच विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निक, आयटीआयला पसंती दिली. मात्र, यावेळी परीक्षाच रद्द झाली असल्याने विद्यार्थ्यांचा उत्तीर्ण होण्याचा टक्का निश्चित वाढणार आहे. त्यामुळे या रिक्त जागा भरण्याची चिन्हे आहेत.

बारावीमध्ये ही असाच प्रकार दिसून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पदवी प्रवेशातील रिक्त जागांची समस्या दूर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे कनिष्ठ महाविद्यालयासह वरिष्ठ महाविद्यालयांनाही अच्छे दिन येण्याची शक्यता आहे.

एकूण जागा - ५, ४३, ७८५

प्रवेश - ३,६६,६२७

रिक्त जागा - १, ७७,१९८

विभागनिहाय जागा

नागपूर

जागा - ५९'२५०

प्रवेश -३४,७९९

रिक्त जागा - २४,४५१

पुणे

जागा - १,०७,०९५

प्रवेश -७१,५५४

रिक्त जागा - ३४,५४१

मुंबई

जागा - ३.२०,७५०

प्रवेश - २,२३,५६१

रिक्त जागा - ९७,०९९

औरंगाबाद

जागा - ३१,४७०

प्रवेश - १६,९३३

रिक्त जागा - १४,५३७

हेही वाचा: कोरोनाने सर्वच व्यवसाय हादरले मात्र डांगराच्या उत्पादनाने सावरले; लॉकडाउनमध्ये आर्थिक आधार

नाशिक

जागा - २५,२७०

प्रवेश - १९,७००

रिक्त जागा - ५,५७०

संपादन - अथर्व महांकाळ