esakal | शेवटचं मंगलाष्टक सुरु असताना अचानक झाली 'त्यांची' एंट्री; लग्नमंडपात उडाली तारांबळ; अखेर...

बोलून बातमी शोधा

बालविवाह
शेवटचं मंगलाष्टक सुरु असताना अचानक झाली 'त्यांची' एंट्री; लग्नमंडपात उडाली तारांबळ; अखेर...
sakal_logo
By
सूरज पाटील

यवतमाळ : जिल्ह्यात संचारबंदी लागू असून, शासनातर्फे विवाहासाठी मर्यादित लोकांची अट घालण्यात आली आहे. मात्र, ग्रामीण भागात लगीनघाई दिसून येत आहे. नेर तालुक्‍यातील मुकिंदपूर (पारधी बेडा) येथे बालसंरक्षण कक्षाने विवाह थांबविला. त्यानंतर घाटंजी तालुक्‍यात नियोजित विवाहाचा डाव उधळून आला.

हेही वाचा: बापरे! १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर २२५ रुपयांना; चक्क जिल्हाधिकारी ऑफिससमोरच काळाबाजार

बालविवाहाचे दुष्परिणाम व बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत लग्न न करण्याबाबत लेखी हमीपत्र घेण्यात आले होते. मात्र, याला न जुमानता त्याच मुलीचा विवाह 20 एप्रिलला वरमंडपी घाटंजी तालुक्‍यात पंगडी येथे नियोजित होता. याबाबत गोपनीय माहिती घाटंजी येथील तहसीलदार तथा तालुका बालसंरक्षण समितीच्या अध्यक्षा पूजा मातोडे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ जिल्हा बालसंरक्षण कक्षाशी संपर्क केला. लग्नमंडपी प्रशासन पोहोचले असताना मोठा सभामंडप, डीजे, रोषणाई व नातेवाइकांच्या उपस्थितीत विवाह सोहळ्यामध्ये शेवटचे मंगलाष्टक सुरू होते. मात्र, यावेळी प्रशासन धडकल्याने सर्वांची तारांबळ उडाली.

या सोहळ्यात कोरोना काळातही मोठी गर्दी केल्याचे व बालविवाह कायद्याचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार तहसीलदार पूजा मातोडे व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधितांवर बालविवाह प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वधू व वधूचे आईवडील सध्यास्थितीत फरार आहेत.

हेही वाचा: 'ते' पाळतात माणुसकीचा धर्म! मुस्लिम तरुण रचतात चिता अन्‌ देतात भडाग्नीही; 923 मृतांवर अंत्यसंस्कार

घाटंजी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक भुजाडे, जिल्हा बालसंरक्षण कक्षाचे आकाश बुर्रेवार, तालुका बालसंरक्षण समितीचे सदस्य अरुण कांबळे, ग्रामसेवक राजाराम बोईनवार, अंगणवाडीसेविका छाया चौधरी व अर्चना आत्राम, तलाठी मुन, मोहन बागेश्वर, सरपंच यमुना मेश्राम, उपसरपंच प्रमोद कदम, कोतवाल अमोल घोडाम यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली.

संपादन - अथर्व महांकाळ