Maharashtra Political Crisis: शरद पवार गटाला मिळणार दिलासा? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांचं राज्यातील सत्तासंघर्षावर मोठं भाकित

ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांचं राज्यातील सत्तासंघर्षावर मोठं भाकित
Maharashtra Political Crisis
Maharashtra Political CrisisEsakal

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह राष्ट्रवादीतून बंड करत भाजप-शिवसेनेसोबत सरकारमध्ये सामिल झाले. त्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडलेत. आपणच खरी राष्ट्रवादी असा दावा करत अजित पवार यांनी निवडणूक आयोगात धाव घेतली आहे. सध्या या प्रकरणाची सुनावणी सुरू असून निवडणूक आयोग काय निर्णय देणार याकडे सर्वांचचं लक्ष लागून राहिलं आहे.

या प्रकरणावर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत एक मोठं भाकीत केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू आहे, तिला सुप्रीम कोर्ट स्थगिती देऊ शकतं, असं मत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं आहे.

पुढे ते म्हणाले की, 'शिवसेना पक्षाची जी सुनावणी निवडणूक आयोगाकडे सुरू होती, त्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली नव्हती. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनावणीला कोर्टात स्थगिती दिली जाऊ शकते, असं भाकित निकम यांनी केलं आहे. न्यायालयाने जर निवडणूक आयोगात सुरू असलेल्या राष्ट्रवादीच्या सुनावणीला स्थगिती दिली. तर शरद पवार यांना मोठा दिलासा असणार आहे.

Maharashtra Political Crisis
NCP Crisis : अजित पवार गटाच्या त्या खेळीने वाढणार शरद पवारांचं टेन्शन? सुप्रीम कोर्टात...

कारण, जोपर्यंत विधानसभा अध्यक्ष आमदार अपात्रतेचा निर्णय देणार नाही, तोपर्यंत राष्ट्रवादी नाव आणि पक्षचिन्ह हे शरद पवार यांच्याकडे राहू शकतं. अशातच अजित पवार गटाने हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे, यावर बोलताना निकम म्हणाले या दोन्ही याचिकेवरील सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं? यावरुन पुढची दिशा ठरेल.

शरद पवार आपल्या मर्जीप्रमाणे पक्ष चालवतात, असा दावा अजित पवार गटाने निवडणूक आयोगात केला आहे. शरद पवार यांच्याकडून पक्षात मनमानी केली जाते, असंही अजित पवार गटानं म्हटलं आहे.

Maharashtra Political Crisis
Sanjay Raut: नाशिक उडता पंजाब होतंय! शाळेतील मुलांच्या बॅगमधून ड्रग...; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

तर, दुसरीकडे विधीमंडळ बहुमत आणि संसदीय बहुमत आमच्याकडे आहे, असं शरद पवार गटाने म्हटलं आहे. तर आमच्या पक्षामध्ये कुठेही फूट नाही. एक गट बाहेर पडला. मूळ पक्ष आमच्याकडे आहे, असा दावा शरद पवार गटाने केला असून कोणताही निर्णय होत नाही तोपर्यंत चिन्ह गोठवू नका. निर्णय होईपर्यंत चिन्ह आमच्याकडेच ठेवा, अशी विनंती शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com