Sanjay Raut: नाशिक उडता पंजाब होतंय! शाळेतील मुलांच्या बॅगमधून ड्रग...; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Drug from school children's bags; Sensational claim of Sanjay Raut...
Sanjay Raut
Sanjay RautEsakal

नाशिक- जिल्हा गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेगळ्या अर्थाने चर्चेला येतोय हे दुर्दैवी आहे. संस्कारी, सभ्य लोकांचे शहर म्हणून नाशिकला ओळखले जाते. अनेक मोठे लोक या जिल्ह्याने दिले आहेत. अनेक मोठे नेते दिले आहेत. पण, सात-आठ महिन्यांपासून ज्या विषयासाठी नाव घेतलं जातंय ते शोभणारं नाही. ड्रग्स माफिया आणि नाशिकचे संबंध जोरदार चर्चेला आलेत, असं उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले.

आम्ही माहिती घेतली. जी माहिती समोर येतेय ती भयंकर आहे. गेल्या वर्षभरापासून नाशिक एक ड्रग्सचा अड्डा बनला आहे. पंजाब आणि गुजरातनंतर नाशिक उडतं नाशिक होतंय की काय अशी शंका येतेय. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा व्यवसाय होत आहे. अनेक ठिकाणांहून ड्रग्स जप्त करण्यात आलंय. त्यातलं बरेचसे ड्रग्स नाशिकला येतंय. यात सहभागी लोकांना राजकीय आश्रय आहे, असा आरोप राऊतांनी केला.

Sanjay Raut
Pune : ड्रग्स तस्कारीतील आरोपी पलायन प्रकरणी मोठी कारवाई; अधिकाऱ्यासंह 9 पोलीस निलंबित

शाळा-कॉलेज यांना ड्रग्सचा विळखा बसला आहे. कॉलेजमधील तरुण-तरुणांना दप्तरातून ड्रग्स पुरवलं जातयं. पालक अस्वस्थ आहेत. गेल्या सहा महिन्यात २० ते ३५ वयोगटातील साधारण १०० च्या आसपास तरुणांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून स्पष्ट झालंय की त्यांचा मृत्यू अंमली पदार्थांमुळे झाला आहे, असं ते म्हणाले. राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत.

एमडी ड्रग्स, कुत्ता गोली, रोलेट अशा प्रकारचे ड्रग्स विकले जात आहेत. कोट्यवधींचा ड्रग्स कारखाना नाशिकमध्ये नष्ट करण्यात आला आहे. यात पोलिस आणि राजकीय आश्रय नक्की आहे. यामुळे तरुण पिढी बरबाद होत आहे. याला जबाबदार कोण आहे? नाशिकचे सध्याचे पालकमंत्री आणि ज्यांना पालकमंत्री व्हायची इच्छा आहे. सध्याच्या परिस्थितीसाठी जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.

Sanjay Raut
Sanjay Raut News : ड्रग्जप्रकरणी मंत्री भुसे, फडणवीसांचा राजीनामा घ्या : संजय राऊत

नाशिकमध्ये अनागोंदी सुरु असताना शिवसेना शांत बसू शकत नाही. आम्ही मोठं आंदोलन हाती घेणार आहोत. २० तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही मोर्चा काढणार आहोत, अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com