

The Bar Council of Maharashtra and Goa Committee revoked the lawyer's license
esakal
मुंबईः सुप्रसिद्ध वकील अॅड. असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आलेली आहे. बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी हा दणका दिला आहे. काऊन्सिलने नियुक्त केलेल्या समितीने सरोदेंबाबत हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे याप्रकरणात सरोदेंना लेखी माफी मागण्याची संधी देण्यात आलेली होती. मात्र त्यांनी ती संधी नाकारली होती.