
माझी हत्या होऊ शकते; ताब्यात घेतल्यावर सदावर्तेंचं मोठं विधान
मुंबई : राज्यभर चाललेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातील आंदोलकांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले आहे. दरम्यान त्यांच्या घरी रात्री अचानक पोलिस दलातील ४-५ कर्मचाऱ्यांनी धाड टाकली आणि त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचं सांगितलं आहे.
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर "माझी हत्या होऊ शकते" असे उद्गार काढले आहेत. ते म्हणाले की मला नोटीस न देता अटक करण्यात आली आहे. आणि दिलीप वळसे पाटील यांच्यावर माझ्या पत्नीने तक्रार दाखल केली आहे." असं सदावर्ते पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर बोलत होते.
दरम्यान आज दुपारी एसटी काही आंदोलकांनी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर दगडफेक आणि चप्पलफेक केली होती. शरद पवार यांच्या खेळीमुळे एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाही असं म्हणत आंदोलकांनी शरद पवारांच्या घरावर चप्पलफेक केली होती. यामुळेच आंदोलकांचे वकील सदावर्तेंना अटक केली गेल्याचं बोललं जातंय.
Web Title: Advocate Gunratn Sadavarte Arrest Dilip Valse Patil Sharad Pawar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..