दिवाळीत ड्रायफ्रूट महागणार!

अफगाणिस्तानातील सत्ताबदलामुळे कोट्यवधींचा माल अडकला
ड्रायफ्रूट
ड्रायफ्रूटsakal
Updated on

नवी मुंबई : अफगणिस्तानचा (afghanistan) ताबा ‘तालिबान’ने (taliban) घेतल्यानंतर भारताच्या ड्रायफ्रूट (dryfruits) व्यवसायावर मोठा विपरित परिणाम झाला आहे. हजारो कोटींचा ड्रायफ्रूटचा माल अफगणिस्तानमध्ये अडकून पडला आहे. त्यामुळे येत्या दिवाळी आणि इतर सणांमध्ये ड्रायफ्रूटचे भाव सुमारे ४० टक्क्यांनी वधारण्याची शक्यता मुंबई ड्रायफ्रूट अँड डेट्स मर्चंट्स असोसिएशनकडून वर्तविण्यात येत आहे.

अफगणिस्तानातील सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर आता त्या देशात तालिबान्यांचे सरकार सत्तेवर येणार आहे. देशात अराजकता माजल्यामुळे व्यापार, व्यवसाय, उद्योग-धंदे ठप्प पडले आहेत. ड्रायफ्रूटची निर्यात हा अफगणिस्तानच्या मुख्य व्यापारापैकी एक आहे. त्यांच्याकडून भारतात अंजिर, जर्दाळू, मनुके आदी ड्रायफ्रूटमधील प्रकार निर्यात केले जातात. ड्रायफ्रूटच्या बाजारात या सर्व सुकामेव्याला चांगली मागणी असते. अफगणिस्तानच्या बाजारातून भारतात दरवर्षी १८ टन वजनाच्या तब्बल ३० ते ३५ हजार गाड्या इतका माल आयात होत असतो. साधारणपणे २५ ऑगस्टपर्यंत या मालाच्या आयातीला सुरवात होते.

ड्रायफ्रूट
ज्युनियर विश्व कुस्तीत भारताच्या बिपाशाला सुवर्ण

सप्टेंबरअखेरपर्यंत १०० टक्के माल भारतात येतो, परंतु सध्या अफगणिस्तानमध्ये निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे सर्व व्यापाऱ्यांनी त्यांचा माल भीतीपोटी बाहेर काढलेला नाही. ज्या व्यापाऱ्यांचे ‘तालिबान’शी संबंध आहेत, असे व्यापारी दलालांच्या मदतीने काही माल काढू शकतील, पण तो आकडा हाताच्या बोटांवर मोजता येईल त्यापेक्षाही कमी असणार आहे.

आता मोहरम, गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी, नाताळ असे सण एकापाठोपाठ येत आहेत. भारतीय बाजारपेठांमध्ये विक्री करण्यासाठी १० टक्क्यांपेक्षा कमी ड्रायफ्रूट शिल्लक राहिल्याने सणासुदीच्या काळात ड्रायफ्रूटचे भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती मुंबई ड्रायफ्रूट अँड डेट्स मर्चंट्स असोसिएशन खजिनदार राजेंद्र शहा यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

ड्रायफ्रूट
मिश्र रिले शर्यतीत भारताला ब्राँझपदक

नव्या व्यापार धोरणाचा फटका बसणार

भारताचे अफगणिस्तानच्या आधीच्या सरकारशी असलेले दृढ संबंध आणि व्यापार धोरणानुसार अफगाणिस्तानातून भारतात येणाऱ्या मालाला करमुक्त करण्यात आले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांना अधिकचा नफा कमावता येत होता, परंतु आता ‘तालिबान’ची सत्ता येणार असल्याने त्यांचे व्यापार धोरण, त्यावर भारताचा निर्णय, हे सर्व अनिश्चित असल्याने ड्रायफ्रूट व्यापाऱ्यांना त्याचाही फटका बसणार आहे.

-सुजित गायकवाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com