सत्तास्थापनेचा पेच कायम; महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदाच अशी वेळ

टीम ई सकाळ
Wednesday, 20 November 2019

राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून तीन आठवड्यांपेक्षा अधिक (29 दिवस) कालावधी लोटला असला, तरी सरकार स्थापन झालेले नाही. सरकार स्थापनेसाठी डिसेंबर महिना उजाडण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. सत्ता स्थापनेसाठी 21 दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ असणार आहे. यापूर्वी 1999 मध्ये सत्ता स्थापनेसाठी 21 दिवस लागले होते.

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून तीन आठवड्यांपेक्षा अधिक (29 दिवस) कालावधी लोटला असला, तरी सरकार स्थापन झालेले नाही. सरकार स्थापनेसाठी डिसेंबर महिना उजाडण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. सत्ता स्थापनेसाठी 21 दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ असणार आहे. यापूर्वी 1999 मध्ये सत्ता स्थापनेसाठी 21 दिवस लागले होते.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असून, परतीच्या पावसाने शेतकऱ्याच्या हातचे पीक गेलेले असतानाही लवकर सरकार स्थापन होण्याची चिन्हे नाहीत. सरकार स्थापनेसाठी डिसेंबरचा पंधरवडा उजडण्याची शक्‍यता आहे. शिवसेनेच्या साथीने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाआघाडीचे सरकार राज्यात आणण्यासाठी नेते प्रयत्न करत आहेत. मात्र, अद्याप तिन्ही पक्षांचे एकत्रित सूर पुरेसे जुळलेले नसल्याने, या तिन्ही पक्षांच्या एकत्रित बैठकाचा मुहूर्तदेखील पुढे ढकलला जात असल्याने एकूणच सरकार स्थापनेबाबतची अनिश्‍चितता कायम आहे.

माजी मंत्री सुरेश जैन यांना दिलासा; जामीन मंजूर

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी याविषयी प्रतिक्रिया व्यक्‍त करताना सांगितले, "तीन वेगवेगळे पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे निश्‍चित अजून काही वेळ जाऊ शकतो. ''डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात सरकार स्थापन होईल, अशी खात्री राऊत यांनी दिली.

फक्त सहा महिन्यात पतंजलीने मिळवला तब्बल एवढ्या कोटींचा महसूल

कर्नाटक विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 5 डिसेंबरला मतदान होणार असून, ही निवडणूक कॉंग्रेससाठी महत्त्वाची आहे. कर्नाटकातील भाजप सरकारचे अस्तित्व या निवडणुकीच्या निकालावर अवलंबून आहे. त्यामुळे शिवसेनेसोबतच्या आघाडीमुळे कर्नाटकमधील कॉंग्रेसची राजकीय गणिते बिघडू नयेत, याची खबरदारी कॉंग्रेसला घ्यावी लागत आहे. 

राज्यात सत्ता स्थापनेसाठी झालेला विलंब
2019 : निकाल जाहीर झाल्यानंतर आज 29 दिवस उलटूनही सरकार स्थापनेची चिन्हे नाहीत. यापूर्वी 1999 साली 21 दिवसानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत सरकार स्थापन केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After 29 days no Government Formation in maharashtra