
माजी मंत्री सुरेश जैन यांना आज (ता.20) मुंबई उच्च न्यायालयाने तीन महिन्यासाठी तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. वैद्यकीय कारणांमुळे जैन यांना न्या. रणजित मोरे आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने पाच लाख रूपयांचा जामीन मंजूर केला आहे.
मुंबई - माजी मंत्री सुरेश जैन यांना आज (ता.20) मुंबई उच्च न्यायालयाने तीन महिन्यासाठी तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. वैद्यकीय कारणांमुळे जैन यांना न्या. रणजित मोरे आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने पाच लाख रूपयांचा जामीन मंजूर केला आहे.
'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
धुळे सत्र न्यायालयाने त्यांना घरकुल योजनेतील गैरव्यवहार बाबतीत दोषी ठरवून शिक्षा व दंड सुनावला आहे. जैन यांना उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल केले होते. शिक्षेविरोधातही त्यांनी न्यायालयात अपील केले आहे.
सुरेश जैन यांची हायकोर्टात याचिका
जैन यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होत आहे. यापूर्वीच रुग्णालयात हलविण्याची परवानगी कारागृह अधिक्षकांनी दिली होती. दरम्यान, सुमारे 29 कोटी रुपयांचा गैरव्यवहार घरकुल योजनेत झाल्याच्या आरोपाखाली जिल्हा सत्र न्यायालयाने जैन यांच्यासह 47 जणांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.