महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून संजय कुमार यांची नियुक्ती...

महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून संजय कुमार यांची नियुक्ती...

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना पुन्हा एकदा मुदतवाढ मिळणार का याच्या जोरदार चर्चा होत्या. मात्र या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदावर आता संजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव अजोय मेहता हे 30 जून रोजी सेवानिवृत्त होत असून मेहता यांच्या निवृत्तीनंतर संजय कुमार राज्याच्या मुख्य सचिवपदाची सूत्रे स्वीकारतील. सध्या संजय कुमार हे गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असून गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे आहे.

संजय कुमार हे 1984 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. तर मावळते मुख्य सचिव अजोय मेहता हे निवृत्तीनंतर मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार म्हणून काम बघणार आहे. मेहता यांच्याकडे कोविड 19 ची परिस्थिती सांभाळण्याची जबाबदारी  येण्याची शक्यता आहे.  मेहता यांनी अल्वाधीतच  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीसाठी उद्धव ठाकरे आग्रही असल्याचे कळते.

अजोय मेहता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार 

राज्याचे सध्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे 30 जून रोजी सेवानिवृत्त होत असून 1 जुलैपासून ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. यासाठी त्यांना मुख्यमंत्री सचिवालयात 603 क्रमांकाचे दालन आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक, प्रशासकीय, यंत्रणा परत वेगाने सुरू करण्यासाठी व्यापक आणि दीर्घ अनुभव असणाऱ्या व्यक्तीची मुख्यमंत्री सचिवालयात नितांत आवश्यकता असल्याने अजोय मेहता यांना निवृत्तीनंतर प्रधान सल्लागार हे पद देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे

1984 च्या बॅच चे अजोय मेहता यांनी प्रशासनात विविध महत्वाची पदे भूषविली आहेत. आता ते प्रामुख्याने कोविड च्या पार्श्वभूमीवर आर्थिक व प्रशासकीय यंत्रणा वेगाने कार्यान्वित करण्याची  तसेच नव्या औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्याची जबाबदारी पार पाडतील

after ajoy mehta Sanjay Kumar to be the new Chief Secretary of Maharashtra

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com