गृहमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात? राष्ट्रवादीतील दोन नेत्यांची नावं चर्चेत

sharad pawar.
sharad pawar.

मुंबई- अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करत अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिन्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते. देशमुख हवा तसा तपास करुन घेण्याला प्राधान्य द्यायचे. माझ्या बदनामीसाठी चुकीचे आरोप करण्यात आले, अनिल देशमुखांची भ्रष्ट कारकीर्द उगड झाल्याने मला बळीचा बकरा बनवण्यात आला, असा दावा परमबीर सिंग यांनी याचिकेमध्ये केला होता. मुंबई हायकोर्टाने याप्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नैतिकता म्हणून अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. अनिल देशमुख यांच्यानंतर गृहमंत्रिपद कोणाकडे जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. गृहमंत्रिपदासाठी  राष्ट्रीवादीच्या दोन नेत्यांची नावे सध्या चर्चेत आहे. गृहमंत्रिपद दिलीप वळसे पाटील किंवा हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवले जाईल अशी चर्चा आहे. यात दिलीप वळसे पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांच्याकडे गृहमंत्रिपद देण्यात आल्यास त्यांच्याकडील उत्पादन शुल्क खातं अजित पवार यांच्याकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे. 

महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आल्यानंतर गृहमंत्रिपद दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची इच्छा होती. पण, प्रकृतीचं कारण पुढे करत वळसे-पाटलांनी गृहमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. सध्या त्यांच्याकडे उत्पादन शुल्क व कामगार खातं आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्रिपद आल्यानंतर त्यांच्याकडील खातं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवलं जाईल असं बोललं जातंय.

कोल्हापूरमधील राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावाचाही विचार केला जाऊ शकतो. राज्यात सरकार स्थापन होत असताना शरद पवारांनी दिलीप वळसे पाटील किंवा जयंत पाटील यांच्याकडे गृहमंत्रिपद स्वीकारण्यासाठी सकारात्मकता दाखवली होती. पण, दोघांनीही या पदासाठी नकार दिल्याने अनिल देशमुख यांची वर्णी लागली होती. देशमुख यांना गृहमंत्रिपद अपघाताने मिळाले, असा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com