पाली : महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतून मिळून जवळपास 200 शेतकऱ्यांची परदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. मात्र, शासनाने दिलेल्या मर्यादित अनुदानानंतर उर्वरित लाखो रुपयांचा बोजा थेट शेतकऱ्यांच्या खिशावर टाकण्यात आला आहे. या अवाजवी आकारणीविरोधात शेतकरी संतापले असून शासनाने तातडीने खर्चाचे पुनर्मूल्यांकन करावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे.