
Increase in fish purchases
ESakal
पाली : पाच दिवसांच्या गणरायाचे विसर्जन झाल्याने अनेकांनी मांसाहाराकडे आपला मोर्चा वळविला आहे. काही दिवसांपूर्वी श्रावणदेखील संपला आहे. त्यामुळे आता खवय्यांच्या उड्या मासळीवर पडत आहे. तसेच समुद्रात मासेमारीसाठी होड्यादेखील रवाना झाल्या आहेत. परिणामी, जिल्ह्यात सध्या समुद्रातील मासेमारी जोरात सुरू आहे. मोठ्या प्रमाणात मासळी सापडत असल्याने तिची आवकदेखील वाढली आहे.