दारू पिण्यासाठी वयाची अट समान हवी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

मुंबई - दारू पिण्यासाठी राज्यात समान वयाची अट असावी, अशी मागणी करणारी याचिका मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. दारू पिण्याकरिता एकसारखे वय नसणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, अशी माहितीही त्यांनी याचिकेत दिली आहे. "हार्ड ड्रिंक' पिण्यासाठी 25 वर्षे, बिअर पिण्यासाठी 21 वर्षे; तर वाईनसाठी 18 वर्षांची अट आहे. बिअरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण वाईनच्या तुलनेत कमी असूनही वाईन पिण्यासाठी कमी वयाची अट आहे. कमी वयात दारू पिण्याची सवय लागल्याने तरुणांमध्ये आरोग्याचा मोठा धोका निर्माण होतो.

मुंबई - दारू पिण्यासाठी राज्यात समान वयाची अट असावी, अशी मागणी करणारी याचिका मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. दारू पिण्याकरिता एकसारखे वय नसणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, अशी माहितीही त्यांनी याचिकेत दिली आहे. "हार्ड ड्रिंक' पिण्यासाठी 25 वर्षे, बिअर पिण्यासाठी 21 वर्षे; तर वाईनसाठी 18 वर्षांची अट आहे. बिअरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण वाईनच्या तुलनेत कमी असूनही वाईन पिण्यासाठी कमी वयाची अट आहे. कमी वयात दारू पिण्याची सवय लागल्याने तरुणांमध्ये आरोग्याचा मोठा धोका निर्माण होतो. यामुळे कोणतीही दारू पिण्यासाठी समान वयाची अट असावी आणि राज्य सरकारने याबाबत खुलासा करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

Web Title: Age condition must be equal to drinking