'शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आंदोलन'

सकाळ न्यूज नेटवर्क 
Friday, 17 January 2020

येत्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला आणि शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास सर्व शेतकरी संघटनांच्या वतीने देशव्यापी तीव्र आंदोलन उभे केले जाणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. 

मुंबई - केंद्र सरकारचे कृषीविषयक धोरण सातत्याने शेतकरीविरोधी राहिल्याने येत्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला आणि शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास सर्व शेतकरी संघटनांच्या वतीने देशव्यापी तीव्र आंदोलन उभे केले जाणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशभरातील शेतकरी संघटनांच्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या कार्यकारी मंडळाची बैठक गुरुवारी मुंबईत पार पडली. राजू शेट्टी म्हणाले की, केंद्र सरकारचे कृषीविषयक धोरण सातत्याने शेतकरीविरोधी राहिले आहे. येत्या काळात केंद्र सरकारचे अर्थसंकल्पी अधिवेशन होणार आहे. यानुषंगाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सर्व घटकांसोबत चर्चा करीत आहेत. पण, त्यांना शेतकरी संघटनांसोबत चर्चा करावीशी वाटत नाही. जाणीवपूर्वक त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

देश अभूतपूर्व मंदीच्या उंबरठ्यावर उभा आहे. शेती क्षेत्राचा वृद्धिदर सातत्याने 1 ते 2 टक्‍क्‍यांपर्यंत घटला आहे. त्यामुळे केंद्राला येत्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रावर लक्ष द्यावे लागेल. तसेच देशातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, अशी आमची मागणी आहे. 
- योगेंद्र यादव, सामाजिक कार्यकर्ते 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agitation if farmers do not get justice says raju shetty