esakal | 'बा विठ्ठला... मुक्‍या-बहिऱ्या आणि आंधळ्या सरकारला सुबुद्धी दे !' 
sakal

बोलून बातमी शोधा

Milk Agitation

सदाभाऊ खोत म्हणाले, राज्यातील सुमारे 46 लाख शेतकरी आज सरकार विरोधातील दूध आंदोलनात रस्त्यावर उतरले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान दिले होते. परंतु महाविकास आघाडी सरकारने अनुदान बंद केले आहे. शिवाय दूध दरात कपात केली आहे. या सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काही एक देणे-घेणे नाही. स्वतःचे खासगी दूध संघ पोसण्याचे काम सध्या या सरकारकडून सुरू असल्याची टीकाही श्री. खोत यांनी केली. तीन पक्षांच्या या सरकारमध्ये एकसंघपणा नाही. एक मुका, दुसरा बहिरा तर तिसरा आंधळा आहे. अशा या सरकारला सर्वसामान्य जनतेचा आक्रोश ऐकायला येत नाही. त्यामुळे अशा निष्क्रिय सरकारच्या विरोधात आणखी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही श्री खोत यांनी दिला. 

'बा विठ्ठला... मुक्‍या-बहिऱ्या आणि आंधळ्या सरकारला सुबुद्धी दे !' 

sakal_logo
By
भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : "राज्यातील तीन पक्षांचे सरकार हे मुके, बहिरे व आंधळे आहे. अशा सरकारला बा विठ्ठला, सु बुद्धी दे', असे साकडे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आज विठ्ठलाला घातले. गाईच्या दुधाला प्रतिलिटर 30 रुपये दर मिळावा, सरकारने प्रतिलिटर दुधाला 10 रुपये अनुदान द्यावे यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी आज रयत क्रांती संघटनेच्या वतीने पंढरपुरात आंदोलन करण्यात आले आहे. आज सकाळी सदाभाऊ खोत यांनी संत नामदेव पायरीजवळ विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालून सरकार विरोधात आंदोलन केले. या वेळी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. 

हेही वाचा : अरे देवा..! इथे मृत्यूनंतरही आत्म्यांना वाट पाहावी लागतेय मोक्षप्राप्तीसाठी; नातेवाईकही हळहळताहेत 

श्री. खोत म्हणाले, राज्यातील सुमारे 46 लाख शेतकरी आज सरकार विरोधातील दूध आंदोलनात रस्त्यावर उतरले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान दिले होते. परंतु महाविकास आघाडी सरकारने अनुदान बंद केले आहे. शिवाय दूध दरात कपात केली आहे. या सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काही एक देणे-घेणे नाही. स्वतःचे खासगी दूध संघ पोसण्याचे काम सध्या या सरकारकडून सुरू असल्याची टीकाही श्री. खोत यांनी केली. तीन पक्षांच्या या सरकारमध्ये एकसंघपणा नाही. एक मुका, दुसरा बहिरा तर तिसरा आंधळा आहे. अशा या सरकारला सर्वसामान्य जनतेचा आक्रोश ऐकायला येत नाही. त्यामुळे अशा निष्क्रिय सरकारच्या विरोधात आणखी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही श्री खोत यांनी दिला. 

हेही वाचा : राष्ट्रवादीसोबत हुकतेच शिवसेनेच्या सत्तेचे टायमिंग, सोलापूरच्या शिवसेना जिल्हाप्रमुखांची व्यथा 

तत्पूर्वी पहाटे माजी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनीही आज पंढरपुरात येऊन चंद्रभागेला दुग्धाभिषेक केला. भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांना दुधाला चांगला भाव दिला होता. दूध पावडर निर्यात अनुदान दिले होते. परंतु या सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची टीका महादेव जानकर यांनी केली. 

या वेळी रयत क्रांती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले, बळिराजा शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर, खर्डीचे उपसरपंच प्रणव परिचारक, स्वप्नील भोसले, सूरज भोसले आदी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल