मुंबई - ‘आम्ही प्रत्येक शाळेत मराठी भाषेची सक्ती केली होती. हिंदी भाषा लादण्याचे किंवा तिसरी भाषा लादण्याचे काम भाजपने केले आहे,’ असा आरोप शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द करीत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा त्यांनी दिला.