छत्रपती संभाजीनगर - येथे शेतीमधील नवे तंत्रज्ञान व माहितीचा खजिना सादर करणारे ‘सकाळ-ॲग्रोवन’चे भव्य ‘ॲग्री एक्स्पो २५’ हे कृषी प्रदर्शन यंदा १० ते १३ जानेवारी दरम्यान होत आहे. या प्रदर्शनाची उत्सुकता आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील जालना रोडवरील केंब्रिज स्कूल जवळ असलेल्या श्रीराम मंदिर ट्रस्टच्या मैदानावर हे भव्य प्रदर्शन भरणार आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत असून प्रवेश विनामूल्य आहे.