"सध्या साखर कारखानदारांनी किंवा छोट्या-छोट्या शेती गटाने ऊस तोडणीसाठी केन कटरची मागणी केल्यास त्याला अनुदान देण्याबाबत निर्णय घेतला जाईल."
कोल्हापूर : ‘खतांचे लिंकिंग करणारे, बनावट खते, औषधे आणि बियाणे विक्री करणाऱ्यांचे परवाने रद्द करून संबंधितांवर तातडीने गुन्हे नोंद करा. खते, कीटकनाशके, बियाणांवर भरमसाठ दर आकारणाऱ्या कंपन्यांवर शासकीय नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय पातळीवर चर्चा केली जाईल. तसेच राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी राज्याचे नवीन कृषी धोरण (New Agricultural Policy) आखले जाईल’, अशी माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी दिली.