Onion Prices Jump by ₹1000 at Belagavi APMC
बेळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) कांदा दरात १ हजार रुपयांची वाढ झाली. देशातून बांगलादेशला कांद्याची निर्यात वाढली आहे. त्यामुळे कांदा दरात वाढ पहायला मिळाली. बुधवारी (ता.१०) देखील प्रतिक्विंटल ५०० रुपयांची वाढ झाली होती. चारच दिवसात कांदा दरात पुन्हा प्रतिक्विंटल १ हजार रुपयांची वाढ झाली आहे. कर्नाटकातील जुना व नवीन, महाराष्ट्रातील जुना तसेच पांढरा कांद्याच्या दरात १ हजार रुपयांची वाढ पहायला मिळाली.