
वाणगाव: शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलदगतीने पोहोचवण्यासाठी जिल्ह्यातील सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. त्यासाठी ॲग्रीस्टॅक (डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ॲग्रिकल्चर) योजना शासन राज्यात राबवत आहे. त्यासाठी जवळच्या महा ई-सेवा केंद्रामध्ये जाऊन आपला ७/१२ला आधार लिंक करून फार्मर आयडी बनवून घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.