औरंगाबादमध्ये ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 December 2019

प्रदर्शनाची वैशिष्ट्ये
शेतीतील आशादायक प्रयोगांविषयी तज्ज्ञ देणार टिप्स
नामांकित कंपन्या, संशोधन संस्थांचा सहभाग 
बॅंका, खते, कीटकनाशके, बियाणे उद्योगांचे स्टॉल
कृषी अवजारे, यंत्रे, ड्रीप, प्रक्रिया उद्योगांचाही सहभाग

स्टॉल बुकिंगसाठी...
हजारो प्रयोगशील शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याची संधी असलेल्या ‘अॅग्रोवन’च्या या कृषी प्रदर्शनात स्टॉल बुकिंगसाठी इच्छुकांना विलास- ८३९०९०३०५५, दत्ता-९८२२७७११३१, आत्तार- ९९२११९९६६३ यांच्याशी संपर्क साधता येईल.

पुणे - राज्यातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञान व माहितीचे पर्वणी ठरणारे ‘सकाळ-ॲग्रोवन’चे भव्य कृषी प्रदर्शन २७ ते ३० डिसेंबरदरम्यान औरंगाबाद येथे होत आहे. ‘सकाळ-ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन म्हणजे शेतकऱ्यांसाठी कृषिविषयक विविधांगी ज्ञानाची शिदोरी समजली जाते. राज्यात असलेल्या तीव्र दुष्काळानंतर अतिवृष्टी, महापुरामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. नैसर्गिक आपत्तींच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला धीर देण्याचा प्रयत्नदेखील ‘ॲग्रोवन’कडून प्रदर्शनाच्या निमित्ताने होत आहे. औरंगाबादच्या बीड बायपासजवळील जबिंदा ग्राउंडवर हे प्रदर्शन भरणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कृषी प्रदर्शनासाठी पारस ग्रुप हे मुख्य प्रायोजक आहेत. तर महाफीड फर्टिलायझर्स, एमआयटी कॉलेज (औरंगाबाद), पूर्वा केमटेक आणि महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) हे सहप्रायोजक आहेत. ‘ॲग्रोवन’कडून यापूर्वी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय प्रदर्शनामुळे हजारो शेतकऱ्यांना शेतीमधील समस्यांशी लढण्याचे बळ मिळाले आहे. आधुनिक शेतीची तंत्र प्रात्यक्षिकांसह समजण्यास या प्रदर्शनाचा उपयोग होत असल्यामुळे शेतकऱ्यांना ‘ॲग्रोवन’च्या प्रदर्शनानंतर नवे प्रयोग करण्यास प्रोत्साहन मिळते. औरंगाबादच्या कृषी प्रदर्शनात बागायती, कोरडवाहू तसेच संरक्षित शेतीमधील उपायांवर मंथन घडवून आणण्याचा प्रयत्न ‘ॲग्रोवन’चा आहे. शेतकऱ्यांना यानिमित्ताने शास्त्रज्ञ, अभ्यासकांची प्रत्यक्ष भेट होईल. विविध कंपन्यांची उत्पादने तसेच नवतंत्रांची ओळख होणार आहे. 

आणखी वाचा - रामाची अयोध्या, घटनापीठाचा एकमुखी निर्णय

या प्रदर्शनाला विशेषतः मध्य महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित राहणार आहेत. शासनाचे विविध विभाग, कृषी संशोधन संस्था, बॅंका, कृषी शिक्षण संस्था, बियाणे, खते, कीटकनाशके, अवजारे क्षेत्रातील कंपन्या तसेच ट्रॅक्टर, हार्वेस्टिंग यंत्रे, कापणी यंत्रे, प्रक्रिया उद्योग, पॅकेजिंग, कोल्डस्टोअर उद्योग, ठिबक व तुषार सिंचन, टिश्‍यूकल्चर, ग्रीन हाउस टेक्नॉलॉजी आणि इंप्लिमेंट्स, कृषी साहित्य ग्रेडिंग, वेईंग, सॉर्टिंग आजारे उत्पादन क्षेत्रातील नामवंत कंपन्या या प्रदर्शनात सहभागी होत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agrowon krushi pradarshan 2019 in aurangabad