

sachin gujar
esakal
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे आज सकाळी धक्कादायक घटना घडली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांना मॉर्निंग वॉकदरम्यान बळजबरीने कारमध्ये ढकलून अपहरण करण्यात आले आणि नंतर बेलापूर बनात नेऊन त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या मारहाणीत सचिन गुजर गंभीर जखमी झाले असून, त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचार सुरू आहेत.