esakal | रोहित पवारांचं भगवा प्रेम, उभारतायत देशातला सर्वात उंच 'स्वराज्य ध्वज'
sakal

बोलून बातमी शोधा

रोहित पवार उभारतायत देशातला सर्वात उंच 'स्वराज्य ध्वज'

रोहित पवार उभारतायत देशातला सर्वात उंच 'स्वराज्य ध्वज'

sakal_logo
By
नामदेव कुंभार

आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून खर्ड्याच्या ऐतिहासिक शिवपट्टण किल्ल्यावर देशातील सर्वांत उंच (७४ मीटर) भगव्या ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. याला स्वराज्य ध्वज असं नाव देण्यात आलं. आहे. भगव्या 'स्वराज्य ध्वजा'चा राज्य व देशातील ध्वज पूजन प्रवास दोन टप्प्यात पार पडणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली. देशातल्या सहा राज्यांमधून जवळपास 12 हजार किलोमीटर प्रवास करत वेगवेगळ्या ठिकाणांहून पूजन यात्रा होणार आहे

'स्वराज्य ध्वजा'चा पहिला टप्पा 9 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर याकालावधीत असणार आहे. दुसरा टप्पा 25 सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत असणार आहे. ही यात्रा कोविडच्या सर्व नियमांचे पालन करत देशभर आणि राज्यभर होणार आहे. या वेळी उपस्थित मान्यवर ध्वजपूजा करतील. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील शिवपट्टण अर्थात खर्डा किल्ल्यावर देशातील सर्वांत उंच ध्वज उभारला जात आहे.

हेही वाचा: JEE मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, 18 जण पहिल्या क्रमांकावर

लोकसहभागातून महाराष्ट्रासह देशभरातील विविध 74 प्रमुख आध्यात्मिक, धार्मिक ठिकाणे तसेच संतपीठे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले या शक्तीपीठांच्या ठिकाणी तसेच श्रीराम मंदिर (अयोध्या), मथुरा, बोधगया (बिहार), केदारनाथ (उत्तराखंड) आदी ठिकाणी ध्वज नेण्यासाठी स्वराज्य ध्वज पूजन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्वराज्य ध्वज’ उभारणी करून ऐतिहासिक वारसा जपणे, पुढील पिढीला स्वराज्याच्या अकल्पित शौर्याची, मराठ्यांच्या संयुक्त फौजांचा शेवटचा विजय जेथे झाला त्या खर्डा किल्ल्याच्या इतिहासाची माहिती देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. स्वराज्याच्या उभारणीसाठी आपल्या शौर्याचे, पराक्रमाचे नवे आयाम स्थापित करून महाराष्ट्राची महती अजरामर करणाऱ्या मावळ्यांच्या कीर्तीची साक्ष असलेल्या खर्डा येथील किल्ल्याच्या आवारात दसऱ्याच्या दिवशी (ता. १५ ऑक्टोबर) स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.

loading image
go to top