

पुणे : ‘‘शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यास शेतकऱ्याला किमान एक लाख रुपयांपर्यंत हमखास उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील. बारामतीमधील अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टमध्ये यशस्वी झालेला ‘एआय’ प्रकल्प आता एका प्रांताचा नव्हे; तर साऱ्या देशाचा होणार आहे,’’असा आत्मविश्वास ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी रविवारी व्यक्त केला.