सातारा - ‘रयत शिक्षण संस्था ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाच्या दृष्टीने सक्षम करणारी एक महत्त्वाची संस्था आहे. जगात शिक्षण आणि उद्योगात अंतर राहू नये, यासाठी प्रयत्न करण्याची गरज असून, तेच काम ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ करेल. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिक्षणाचा वारसा नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक समृद्ध होत आहे आणि हे पाऊल देशाच्या नव्या पिढीला एक उज्ज्वल भविष्याची दिशा देणारे ठरेल,’ असा विश्वास रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.