Ajit Pawar and Sandeep KshirsagarESakal
महाराष्ट्र बातम्या
Politics: अजित पवार आणि संदीप क्षीरसागर भेटीमागचं कारण काय? पडद्यामागं काय घडलं? दादांनी सगळंच सांगून विषय संपवला!
Ajit Pawar and Sandeep Kshirsagar: आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुप्त बैठक घेतली. यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र, त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
किल्ले शिवनेरीच्या पायथ्यावर जुन्नर बाजार समितीच्या कार्यालयातील बंद खोलीत अजित पवार आणि संदीप क्षीरसागर यांच्या अर्धातास चर्चा झाली. यावेळी अजित पवारांनी संदीप क्षीरसागर सोबत एकत्र असताना दोन फोनही लावल्याची माहिती समोर आली आहे. यावर आता दोन्ही नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भेटीमागचे कारण सांगत त्यांनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

