
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच नाॅट रिचॅबल होते. ते आज बुधवारी तिस-या दिवशी विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होणार आहेत. त्याआधी त्यांनी सकाळी त्यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांच्या भेटीघाटी घेतल्या. अजित पवार हे खातेवाटपावरून नाराज असल्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. पण आज हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी ते नागपुरात आले.