अजित पवारांनी संभाजी राजेंना केला फोन अन् म्हणाले...

Ajit Pawar call to Sambhaji Raje because of sarthi meeting
Ajit Pawar call to Sambhaji Raje because of sarthi meeting

कोल्हापूर - गेल्या काही दिवसांपासून सारथी संस्थेतील गैरव्यवहाराच्या आरोपांसह विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसंदर्भात चर्चा सुरू आहे. सारथीवरून विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली होती. सारथीच्या संदर्भातील वाद वाढ असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हस्तक्षेप केला असून, सारथी संबंधित मुद्यांवर उद्या बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी छत्रपती संभाजीराजे भोसले यांना अजित पवारांनी फोन केला असून, या बैठकीला हजर राहण्याची विनंती केली आहे.

सारथी संस्थेच्या कारभारावर मराठा संशोधक विद्यार्थ्यांनी टीका चालवली आहे. त्यामुळे एका नव्या वादाने तोंड वर काढले आहे. याच वादावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी सारथीचा प्रश्न सातत्यानं मांडत असलेले छत्रपती संभाजीराजे भोसले यांना हजर राहण्याची विनंती अजित पवार यांनी केली आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी ट्विट तसेच फेसबुक पोस्ट करून यासंदर्भातील माहिती दिली.

संभाजीराजे यांनी फेसबुकवर आपल्या मागण्या संदर्भात केलेली पोस्ट

मराठा समाजाच्या हितासाठी स्थापन झालेल्या व प्रचंड त्यागातून मिळवलेल्या सारथी संस्थे बाबत समाजाने जे आंदोलन उभं केलं आणी दबाव निर्माण केला त्याचा आदर करत सरकारने चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे.
मा.उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मला फोन करून मुंबईला चर्चेसाठी येण्याची विनंती केली. काही महिन्यांपूर्वी समाजाच्या वतीने पुण्यात सारथी कार्यालयाच्या बाहेर लाक्षणिक उपोषण केले होते. त्यावेळी जी आश्वासने सरकार ने दिली होती, ती न पाळल्याचा अनुभव गाठीशी असताना सुद्धा समाजाच्या तीव्र भावना सरकार पर्यंत पोहचवणे हे माझे कर्तव्य समजून पुन्हा चर्चेला जाण्याचा निर्णय घेत आहे. माझ्यासाठी समाजाचे हित सर्वोच्च आहे.

समाजाच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या जाहीर आहेत. पैकी,

1)सारथी ही 'स्वायत्त' संस्था म्हणून टिकली पाहिजे. स्वायत्तते बाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

2) जे अध्यादेश राज्यपाल शासन असताना गुप्ता नावाच्या अधिकाऱ्याने काढले ते सर्व रद्द केले पाहिजेत.

3) शासनाने कथित गैरव्यवहाराची चौकशी केली, तिच्या मध्ये काही तथ्ये आढळली का? किती रुपयांचा घोटाळा झाला? हे शासनाने जाहीर करावे. झालेला सर्व जमाखर्च हा ऑनलाईन करावा, अन्यथा सारथी ची जाणीव पूर्वक बदनामी केली म्हणून जबाबदार अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी.

4) तारदूत प्रकल्प हा समाजोपयोगी असून तो बंद करण्यात येऊ नये. उलट त्याची व्याप्ती वाढवण्यात यावी.

5) ज्या लाभार्थी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मिळाली नाही ती लवकरात लवकर देण्यात यावी.

6) शासनाने नवीन कोण कोणत्या योजना कल्पिल्या आहेत, त्या जाहीर करण्यात याव्यात.

गरीब मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन झालेली ही संस्था स्वायत्त तर राहिली पाहिजेच. पण तिला जास्तीत जास्त निधी दिला गेला पाहिजे.

वरील प्रमुख मागण्या ह्या प्रथमदर्शनी मला दिसल्या. या व्यतिरिक्त अजून काही मागण्या असतील तर जाणकारांनी त्या मला कळवाव्यात. कंमेंट बॉक्स मध्ये व तसेच, office@sambhajichhatrapati.com या इमेल वरती आपण लवकरात लवकर पाठवणे इष्ट राहील.

अशा आशयाची पोस्ट संभाजीराजे यांनी सोशल मिडीयावरुन केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com