
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टीकरण देताना उपमुख्यमंत्रीपदाबात कुठलीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टीकरण देताना उपमुख्यमंत्रीपदाबात कुठलीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर काल (ता.२८) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून शिवाजी पार्कवर शपथ घेतल्यानंतर नवे सरकार अस्तित्वात आले. उद्धव यांनी आज पदभारही स्वीकारला. त्यांनंतर त्यांनी आरे कारशेडला स्थगिती दिली. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला पाठिंबा असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप
अजित पवार म्हणाले, उपमुख्यमंत्रीपदाबाबत राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कुठलीही चर्चा झालेली नाही, वरिष्ठ पातळीवर याविषयी काही चर्चा झाली असल्यास मला माहित नसल्याचेही त्यांनी सांगितले. सत्तेचं वाटप यापूर्वी झालं असून विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे तर उपाध्यक्ष राष्ट्रवादीकडे आलं असल्याचा पुनुरुच्चारही त्यांनी केला.
#DevendraFadanvisForPM होतोय ट्रेण्ड; कोणी केला पाहून व्हाल चकित
विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसने उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत नावं द्यावं असं काँग्रेसला सांगण्यात आले असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. काँग्रेसने उद्या 3 नावं द्यावीत असं ठरलं असून त्यातील एक नाव फायनल केलं जाणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. तसेच, आरे कारशेडवर शिवसेनेच्या भूमिकेला सुप्रिया सुळे यांचा पाठिंबा होताच त्यामुळे आमचाही पाठिंबा आहेच. मुख्यमंत्री म्हणून आता उद्धव यांना निर्णय घेण्याचा अधिकार पूर्णपणे अधिकार असल्याचेही त्यांनी सांगितले.