#DevendraFadanvisForPM होतोय ट्रेण्ड; कोणी केला पाहून व्हाल चकित

टीम-ई-सकाळ
Friday, 29 November 2019

#DevendraFadanvisForPM हा हॅशटॅग सध्या सोशल मिडीयावर जोरदार ट्रेण्ड होत आहे. पण, हा हॅशटॅग महाराष्ट्र विकास आघाडीच्या समर्थकांनीची ट्रेण्ड केल्याचे आपल्याला पाहायला मिळेल. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपहासात्मक लिहताना हा हॅशटॅग ट्रेण्ड करत फडणवीस यांच्यासारख्या हुशार नेतृत्वाची राज्याला नाहीतर देशाला गरज असल्याचे म्हणणे नेटीझन्सनी सोशल मिडीयावर मांडले आहे.

पुणे : #DevendraFadanvisForPM हा हॅशटॅग सध्या सोशल मिडीयावर जोरदार ट्रेण्ड होत आहे. पण, हा हॅशटॅग महाराष्ट्र विकास आघाडीच्या समर्थकांनीची ट्रेण्ड केल्याचे आपल्याला पाहायला मिळेल. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपहासात्मक लिहताना हा हॅशटॅग ट्रेण्ड करत फडणवीस यांच्यासारख्या हुशार नेतृत्वाची राज्याला नाहीतर देशाला गरज असल्याचे म्हणणे नेटीझन्सनी सोशल मिडीयावर मांडले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर आज (ता.२८) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून (ता. 28) शिवाजी पार्कवर शपथ घेतल्यानंतर नवे सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारला घेरण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरु झाले. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनीही ट्वीट टीकात्मक ट्वीट केले. यावरूनच नेटीझन्सच्या म्हणण्यानुसार अशा तत्पर नेत्याची राज्यात नाहीतर देशाला गरज असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

साध्वी प्रज्ञासिंह यांना जिवंत जाळण्याची धमकी !

एक मराठी माणूस पंतप्रधान व्हायला पाहिजे अशी मागणी अनेक वर्षांची असताना आदरणीय तरुणांचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे आल्याने अनेकांना पोटशूळ उठला असेल, अशा सर्वांना महाराष्ट्रात राहण्याच्या अधिकार नाही. तसेच, राज्यातील अनेक आंदोलने यशस्वी रित्या संपुष्टात आणण्याचा हातखंडा असलेल्या फडणवीसांनी आता देशाची धुरा हाती घेवून दिल्लीत होणारी देशद्रोह्यांचे आंदोलने, अर्धनग्न शेतकऱ्यांचे आंदोलने संपुष्टात आणावी म्हणजे २०२० पर्यंत देश महासत्ता होईल. अशा आशयाची उपहासात्मक ट्वीट्स दिसत आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #DevendraFadanvisForPM trend on Twitter