तुम्ही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री व्हायचं अन् बाकीच्यांच काय? अजित पवार संतापले | Ajit Pawar criticizes Eknath Shinde government | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar  Eknath Shinde  Devendra Fadnavis

तुम्ही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री व्हायचं अन् बाकीच्यांच काय? अजित पवार संतापले

पिंपरी - राज्यात मोठ्या प्रमाणात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहे. याकडे लक्ष देण्यासाठी सरकारमधील कोणाही नाही म्हणत विरोधी पक्षानेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सचिवांनी अधिकार देण्याचे आदेश काढण्यावर अजित पवार यांनी कडाडून टीका केली. (Ajit Pawar news in Marathi)

हेही वाचा: आज मी राज्याचा उपमुख्यमंत्री...अजित पवार गोंधळले,VIDEO

अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्याच्या सचिवांना अधिकार देण्याचे आदेश काढले. हे आदेश ४ ऑगस्टचे आहे. ही अवस्था आहे. जिल्हा परिषदा, महापालिकांच्या मुदती संपल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून जे काही संविधान, कायदा, नियम केले, त्यातून भारत एकसंध राहिला आहे. मात्र इथं निवडणुका होऊ दिल्या जात नसल्याची खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: राज्यात गदा अन्‌ धनुष्यबाण आपलाच - देवेंद्र फडणवीस

पवार पुढं म्हणाले की, कोर्टाने सांगितंल की, निवडणुका घ्या. काही जण म्हणतात यांना फेब्रुवारीमध्ये निवडणुका घ्यायच्या. पिंपरी महापालिका, पुणे महापालिका आणि पुणे जिल्हा परिषदेत जागा वाढल्या होत्या. त्या कमी करण्याचा निर्णय घेतला. तुम्ही दोघांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व्हायचं. बाकीच्यांना प्रतिनिधीत्व द्यायच नाही. तिथं अधिकार सचिवांना द्यायचे. हे कस जमणार, तुम्ही लोकशाहीचा मुडदा पाडल्याचं म्हणत अजित पवार यांनी संताप व्यक्त केला.

Web Title: Ajit Pawar Criticizes Eknath Shinde Government Rad88

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..