

Black Magic Allegations in Ajit Pawar Death Case
esakal
Nashik Crime: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या माध्यमातून अजितदादांच्या घराबाहेर काळी जादू आणि तंत्रमंत्र करण्यात आल्याचा संशय रोहित पवारांनी व्यक्त केला आहे. हे सगळं पक्षावर कंट्रोल मिळवण्यासाठी सुरु होतं का? अजित पवारांचा घातपात झालाय का? असे प्रश्न उपस्थित करत रोहित पवारांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
रोहित पवार म्हणाले की, अजित पवारांच्या निधनापूर्वी २८ जानेवारीच्या अगोदर नाशिकचा भोंदूबाबा खरात याच्या माध्यमातून अजितदादांच्या घराबाहेर पूजा किंवा ब्लॅक मॅजिक करण्याच प्रयत्न झाला होता का? अजितदादांच्या पक्षावर कंट्रल मिळवण्यासाठी काही लोक प्रयत्न करीत होते.