

ZP election commission update for Maharashtra voters
esakal
Maharashtra ZP Election Update : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. मात्र जिल्हा परिषदांच्या निवडणुकांवर याचा परिणाम होणार नसून या निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे निवडणूक आयोगातील सूत्रांनी सांगितले. निवडणूक काळात राज्याच्या प्रमुखपदावरील व्यक्तीचे निधन होण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे अशा प्रकारे निवडणूक रद्द करण्याबाबत कोणताही स्पष्ट आदेश निवडणूक नियमांत नाही. त्यामुळे निवडणुकीच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम होणार नाही, असे निवडणूक आयोगातील सूत्रांनी सांगितले आहे.