

Deputy CM Ajit Pawar discusses the Parth Pawar Pune land deal issue with the Chief Minister amid growing political attention.
esakal
Ajit pawar on Parth Pawar Pune Land Deal Case Update : राज्यात सध्या अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरण चांगलंच गाजत आहे. विरोधकांकडून हा मुद्दा उचलला गेला आहे आणि यावरून जोरदार टीकाही सुरू आहे. थेट राहुल गांधी यांनीही या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय. तर राज्यात मुख्यमंत्री फडणवीसांनी याप्रकरणी चौकशी समिती गठीत केली आहे, शिवाय काही अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली आहे.
पार्थ पवार यांचे वडील आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या शासकीय निवास्थानी जाऊन भेट घेत चर्चा केली. यानंतर अजित पवारांनी मीडियाला प्रतिक्रिया देताना, या व्यवहार प्रकरणी त्यांची भूमिका स्पष्ट करत, त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना नेमकं काय सांगितलंय, याबाबत माहिती दिली.
अजित पवार म्हणाले, ‘’मी आधीही स्पष्टपणे सांगितलेलं होतं की, आजपर्यंतच्य माझ्या गेल्या ३५ वर्षांच्या राजकीय जीवनात मी कधीही नियम सोडून कुठलंही काम केलेलं नाही. मागे २००९-२००१०मध्ये माझ्यावर काही आरोप झाले, परंतु ते आरोप सिद्ध झाले नाहीत. या व्यवहारात मला अजिबात काही माहिती नव्हतं. माहिती असतं तर मी लगेचच सांगितलं असतं, की होय मला विचारून तो व्यवहार झालेला आहे. मी कुणालाही माझ्या जवळच्या घरातल्या नातेवाईकांनी, माझ्या मुलांनी किंवा जे कोणी माझ्या जवळचे असतील यांनी व्यवहार केला तर किंवा कुठलीही गोष्ट केली तर मी त्यांना आधीच सांगत असतो, की ती सगळी बाब कायद्याच्या नियमाला धरूनच असली पाहीजे.’’
तर ‘’आता हा व्यवहाराबाबत मी जी माहिती घेतली, त्यामध्ये चर्चा मोठ्याप्रमाणात सुरू झाल्यावर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळी नागपूरात होते. त्यावेळी त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला आणि मी त्यांना सांगितले की, जरी माझ्या घरातल्या जवळच्यांच्या संबंधित हा विषय असला, तरी तुम्ही राज्याचे प्रमुख आहात तुम्हाला जे काही नियमाप्रमाणे करावं लागेल, याची चौकशी करावी लागेल, काय तुमच्या मनात समिती नेमायची असेल जे काही करायचं असेल ते करा, कारण आपण संपूर्ण राज्याचं नेतृत्व करत आहात. माझा त्या गोष्टीला पाठिंबाच राहील. कारण, शेवटी आरोप करणं सोपं असतं परंतु त्या आरोपातील वस्तूस्थिती नेमकी काय आहे, हे जनतेला कळणं देखील तितकच महत्त्वाचं असतं.’’ असं अजित पवारांनी सांगितलं.
याशिवाय, ‘या बद्दलची माहिती घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या व्यवहारात एक रुपयाही दिला गेला नाही. तरी मोठे आकडे सांगितले गेले, मोठ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि विरोधकांनी पण आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, साहाजिकच आहे ते त्यांचं कामच आहे.’’ असंही यावेळी अजित पवार म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.