esakal | अजित पवारांचा पक्षात दबदबा; कट्टर समर्थकांना मंत्रिपदे 
sakal

बोलून बातमी शोधा

ajit pawar dominates nationalist congress party

अजित पवारांचा पक्षात दबदबा; कट्टर समर्थकांना मंत्रिपदे 

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात अपेक्षेप्रमाणे अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत. आजच्या विस्तारातही अजित पवार यांच्या कट्टर समर्थकांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. त्यामुळे, राष्ट्रवादीत अजित पवार यांचा दबदबा कायम असल्याचे मानले जाते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
धनंजय मुंडे यांना मंत्रिपद
भारतीय जनता पक्षासोबत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र, औटघटकेचे ते सरकार कोसळले. त्यानंतर अजित पवार यांना पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसमधे सक्रिय करण्यात पक्षाच्या सर्व नेत्यांना यश आले. आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे, दत्तात्रय भरणे, संजय बनसोडे आणि अदिती तटकरे यांचा समावेश करण्यात आला आहे. हे चारही आमदार अजित पवार यांचे समर्थक मानले जातात. अजित पवार यांच्या बंडानंतर धनंजय मुंडे यांच्यावरही पक्षांतर्गत नाराजीचा सूर होता. त्यामुळे, मुंडे यांना मंत्रिपद मिळेल की नाही, याबाबत तर्कवितर्क सुरू होते. मात्र, त्यांना आज कॅबिनेट मंत्रिपद मिळाले असून, अजित पवार यांच्या आग्रहानेच ते मिळाल्याची चर्चा आहे.

आणखी वाचा - बाप लेकासह मामा भाचेही मंत्रिमंडळात!
आणखी वाचा - जानेवारीत बँकांना दहा दिवस सुटी

संजय बनसोडेंना संधी कशी?
संजय बनसोडे हे पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आहेत. पक्षात इतरही ज्येष्ठ आमदार असताना संजय बनसोडे यांना राज्यमंत्री पदाची संधी दिली आहे. दत्तात्रेय भरणे हे धनगर समाजातील असून, पश्‍चिम महाराष्ट्रात या समाजाला प्रतिनिधी मिळणे आवश्‍यक होते, तर लातूरचे संजय बनसोडे हे बौद्ध समाजातील असून, या समाजाला प्रतिनिधित्व म्हणून बनसोडे यांना मंत्रिपद मिळाल्याचे सांगण्यात येते; पण भरणे व बनसोडे यांच्या मंत्रिपदाच्या मागे केवळ अजित पवार यांचाच आग्रह असल्याची चर्चा राष्ट्रवादीत रंगली आहे.

loading image
go to top