इम्पिरिकल डेटासाठी आग्रह धरू : अजित पवार | Ajit Pawar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar
इम्पिरिकल डेटासाठी आग्रह धरू : अजित पवार

इम्पिरिकल डेटासाठी आग्रह धरू : अजित पवार

खंडाळा : राज्यातील निवडणुका (Election) या ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) होत आहेत. यासंबंधी असणारा इम्पिरिकल डेटा (Empirical data) हा दोन महिन्यांत मार्चपर्यंत होणे अपेक्षित आहे. यासाठी लागणारा निधी व कर्मचारी वर्ग महाविकास आघाडीने उपलब्ध करून दिला आहे. आयोगाकडून मार्चपर्यंत हा इम्पिरिकल डेटा मिळावा, यासाठी आम्ही आग्रह धरणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. नायगावमध्ये ग्रामसचिवालय व प्राथमिक शाळेची नवीन इमारतीसाठी निधी देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नायगाव (ता. खंडाळा) येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्ताने अभिवादन करण्यासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ओबीसी आरक्षणविषयी विचारलेल्या प्रश्नावर पवार म्हणाले, ‘‘इम्पिरिकल डेटासाठी दोन्हीही सभागृहांच्या मंजुरीने लागणारा निधी व सर्व कर्मचारी महाविकास आघाडीने उपलब्ध करून दिल्याने आता याविषयी निधीची अडचण दूर झाली आहे.

हेही वाचा: पुणे : महापालिका सोमवारपासून सुरु करणार गुंठेवारीची नोंदणी

याआधी मुख्यमंत्री व मी आयोगाशी बोललो असता दोन महिन्यांत इम्पिरिकल डेटा देऊ, असे सांगितले होते. यानंतर आता ही आयोगाशी पुन्हा बोलण्यात येईल. आयोगाने ठरवले तर दोन महिन्यांत हे पूर्ण व्हायला हरकत नाही. तरी येत्या दोन महिन्यांत इम्पिरिकल डेटा देण्यासंबंधी आम्ही आग्रह धरणार आहे.’’

प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह : भुजबळ

प्रत्येक जिल्ह्यात सावित्रीबाई फुले वसतिगृह स्थापनार आहे. पुणे येथे ‘सावित्रीबाई फुले यांची पहिली शाळा’ म्हणून नवीन वास्तू बनवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. नायगाव (ता.खंडाळा) येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Ajit Pawarempirical data
loading image
go to top