
Sharad Pawar's Birthday: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज 85वा वाढदिवस आहे. जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान आज सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अजित पवार यांनी दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी शरद पवारांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. सुप्रिया सुळेंनी अजितदादांचे स्वागत केले. यावेळी अजित पवार यांच्या सोबत सुनित्रा पवार, पार्थ पवार, अजित पवार गटाचे, प्रफुल्ल नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते. पक्षफुटीनंतर काका-पुतण्याची ही पहिलीची भेट असल्याचे बोलले जात आहे.