After Dhananjay Munde, Amarsingh Pandit Triggers Fresh Controversy : गोपीनाथ मुंडे, महाराष्ट्रातला कर्तृत्ववान नेता. वंजारी समाजाचा चेहरा, ओबीसींसाठीचा देवमाणूस. आज मुंडेंचा फोटो अनेकांच्या देव्हाऱ्यात आहे. पण याच देवमाणसाच्या बालेकिल्ल्याला म्हणजेच बीड जिल्ह्याला सध्या गुन्हेगारीचं ग्रहण लागलंय. मुंडेंच्या प्रयत्नांमुळे बीड जिल्ह्याला मंत्रालयात, पोलीस खात्यात स्थान मिळालं. बीड जिल्हा नावारुपाला आला, पण तोच बीड जिल्हा त्यांच्याच घरात एकेकाळी नोकर राहिलेल्या आणि आता त्यांच्या पुतण्याच्या अत्यंत जवळचा मानल्या जाणाऱ्या वाल्मिक कराडमुळे बदनाम झाला. आणि त्याला निमित्त ठरलं ते संतोष देशमुख हत्या प्रकरण.