

ajit pawar death
esakal
माजलगाव: बीड जिल्ह्यातल्या माजलगाव शहरातील जोशी गल्ली येथील रहिवासी असणारे गजानन गुंजकर गुरुजी हे मागील आठ वर्षांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पूजाविधीसह पौरोहित्य करतात. पवार कुटुंबीय अतिशय चांगले कुटुंब असून अजितदादा हे स्पष्टवक्ते व शब्दाला जागणारा माणूस म्हणून आपण नेहमीच अनुभवले असल्याची भावना गुंजकर गुरुजींनी व्यक्त केली. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आपल्यावर आली हे मनाला अत्यंत वेदानादायी वाटले, असेही ते म्हणाले.