Ajit Pawar : बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

Ajit Pawar : बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया!

Ajit Pawar :  विधानपरीषद निवडणुकीच्या निकालांवनंतर काँग्रेसमधील अंतर्गत कलह वाढला आहे. काँग्रेसते जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. 

बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला त्यानंतर नाना पटोले यांच्यावर  प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र महत्वाचे विधिमंडळ गटनेते पद बाळासाहेब थोरात यांच्याकडे होते. त्याचा देखील बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला. यावर विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. 

अजित पवार म्हणाले, आज मी बाळासाहेब थोरात यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. यावेळी त्यांनी मला विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले. पण हा माझ्या पक्षाअंतर्गत प्रश्न आहे. हा प्रश्न मी वरिष्ठांशी बोलून सोडवले, असे बाळासाहेब थोरातांनी सांगितल्याचे अजित पवार म्हणाले. 

दरम्यान, बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्याची पक्षश्रेष्ठींनी घेतली दखल घेतली असून प्रभारी एच के पाटील मुंबईकडे रवाना झाले आहेत. पक्षातील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी प्रभारींना महाराष्ट्रात पाठवले असून बाळासाहेब थोरात यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.