Ajit Pawar Latest Update : अजित पवारांच्या गटानं हिसकावली शिंदे-फडणवीसांची 'ही' खाती

खातेवाटपावरून शिंदे-फडणवीस आणि अजित पवार यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा सुरू होत्या
Ajit Pawar
Ajit PawarEsakal
Updated on

Maharashtra Political Update : राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षात बंड केलं आणि शिंदे-फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राजकीय वर्तुळात घडामोंडीना वेग आला आहेत. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या इतर आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र या शपथविधीला बरेच दिवस उलटून गेले तरी मंत्र्यांचे खातेवाटप अद्याप झालेलं नाही. तर आपल्या मंत्रीपदाला कात्री लागण्याची शक्यता असल्यामुळे अनेक आमदार नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. (Latest Marathi News)

साम टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळात अर्थखाते हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवले जाणार आहे. तर सहकार मंत्रालयाची जबाबदारी ही दिलीप वळसे पाटील यांच्याकडे दिली जाणार आहे. ही दोन्ही खाती यापूर्वी भाजपकडे होती. त्यामुळे मोठ्या चर्चेनंतर भाजपकडील ही खाती राष्ट्रवादीला सोडण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. जवळपास ही खाती निश्चित झाली आहेत, तर आजच खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता आहे.(Latest Marathi News)

Ajit Pawar
Ajit Pawar Portfolio : अखेर शिक्कामोर्तब! अजित पवारांकडे अर्थ खातं, वळसेंकडेही मोठी जबाबदारी; लवकरच घोषणा

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळील चार खाती राष्ट्रवादीला देण्यात आली आहेत.

१) परिवहन

२) कृषी

३) सामाजिक न्याय

४) अल्पसंख्यांक

Ajit Pawar
Balasaheb Thorat News : 'पवार महाराष्ट्रात फक्त हात जोडून जरी फिरले तरी राष्ट्रवादी उभी राहिल'

तर भाजप जवळील पाच खाती राष्ट्रवादीला देण्यात आली आहेत.

१) अर्थ

२) सहकार

३) महिला आणि बाल कल्याण

४) अन्न व नागरी पुरवठा

५) क्रीडा व युवक कल्याण

खातेवाटपावरून शिंदे-फडणवीस आणि अजित पवार यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अर्थमंत्रीपद अजित पवारांकडे देण्यास शिवसेनेच्या आमदारांचा विरोध होता. यानंतर बऱ्याच बैठका आणि चर्चा करण्यात आल्या मात्र अजित पवारांनी अर्थ खात्याचा आग्रह धरला होता. यानंतर अखेर खातेवाटप निश्चित झाल्याचं बोललं जात आहे.(Latest Marathi News)

Ajit Pawar
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर नवी उपाययोजना; ‘रोड हिप्नॉसिस’ टाळण्यासाठी फलक अन् झेंडे

अजित पवार गटाला मिळणारी खाती

१) अर्थ खाते - अजित पवार

२) कृषी खाते- छगन भुजबळ

३) सहकार खाते- दिलीप वळसे पाटील

४) परिवहन- धर्मराव अत्राम

५) सामाजिक न्याय - धनंजय मुंडे

६) अन्न नागरी पुरवठा - अनिल भाईदास पाटील

७) महिला बाल कल्याण - अदिती तटकरे

८) क्रीडा - संजय बनसोडे

९) अल्पसंख्यांक - हसन मुश्रीफ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Ajit Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com