केंद्राने केंद्राचे काम करावं, अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी

Ajit Pawar
Ajit PawarSakal
Updated on
Summary

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जीएसटी परिषदेच्या लखनऊमधील बैठकीवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जीएसटी परिषदेच्या लखनऊमधील बैठकीवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. तसंच प्रश्न उपस्थित करताना त्यांनी पेट्रोल, डिझेल संदर्भात सुरु असलेल्या चर्चेवरून केंद्र सरकारला सुनावलं आहे. पेट्रोल डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश केल्यास त्याबाबत महाराष्ट्र भूमिका घेईल असं अजित पवार म्हणाले. राज्याच्या कर लावण्याच्या अधिकारावर गदा येऊ नये अशी राज्य राज्यसरकारची भूमिका असेल असं त्यांनी स्पष्ट केलं.

केंद्राने केंद्राचे काम करावे, पण राज्याचे जे अधिकार आहेत त्यावर गदा येऊ नये, राज्याचे अधिकार तसेच रहावेत असे अजित पवार म्हणाले. मुद्रांक शुल्क आणि जीएसटीमधून राज्याला कर मिळतो. जे काही ठरलंय त्याप्रमाणे चालु रहावे. कोरोनाच्या संदर्भात ज्या सवलती आधी दिल्या आहेत त्या द्याव्यात असंही अजित पवार यांनी सांगितले.

Ajit Pawar
उद्धव ठाकरेंचे सरकार सर्वांना एकत्र घेऊन जाणारे - अजित पवार

पेट्रोल डिझेल संदर्भात काही भूमिका घेतली तर तिथे काही वेगळे मत येऊ शकते. राज्य सरकारचा कर कमी करण्याच्या अधिकार आहे आणि त्यावर जर गदा येत असेल तर आम्ही भूमिका घेऊ असेही अजित पवार म्हणाले. तसंच लखनऊमध्ये होत असलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीबाबतही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Latest Marathi News Live Update
IMD predicts heavy rainfall
State Government Revamps Land Acquisition System; 103 Officer Posts Reorganized
Travel Alert: Pune–Mumbai Passengers Face Delays as 25 Trains Take Alternate Route
Marathi News Esakal
www.esakal.com