महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हनी ट्रॅप प्रकरण चर्चेत आलंआहे. हनी ट्रॅपमधे मोठे अधिकारी, मंत्री, राजकारणातले अनेक आजी-माजी मंत्री अडकल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला होता. आता या प्रकरणावर उपमुख्यंत्री अजित पवार पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले की, लोकांना सत्य काय ते कळलं पाहिजे, कुणीही नुसता दम देऊ नये जर त्यांच्याजवळ सीडी, पेन ड्राईव्ह, असेल तर त्यांनी तो दाखवावा लोकांसमोर सत्य आले पाहिजे केवळ आरोप करुन उपयोग नाही, यामुळे सगळेच संशयाच्या भोवऱ्यात येतात.