Sharad Pawar: 'अजित पवार म्हणजे पक्ष...', बंडानंतर शरद पवार पहिल्यांदाच दादांचं नाव घेऊन बोलले

Maharashtra Politics News: शरद पवार येत्या काही दिवसात राज्यभरात दौरा करणार आहेत
Sharad Pawar News
Sharad Pawar NewsEsakal
Updated on

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रविवारी मोठा राजकीय भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झाली असून जवळपास 40 आमदारांसह अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे ९ आमदार मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर शरद पवार या संपूर्ण घटनेनंतर अॅक्शनमोडमद्धे आले आहेत. (Latest Marathi News)

शरद पवार येत्या काही दिवसात राज्यभरात दौरा करणार आहेत. तर सातारा दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अजित पवारांचे नाव घेऊन अजित पवार म्हणजे पक्ष नाहीत असं शरद पवार म्हणाले आहेत.

Sharad Pawar News
Amol Kolhe : 'बाप नाही विसरायचा...',काल अजित पवारांना पाठिंबा अन् आज खासदार अमोल कोल्हे शरद पवारांसोबत

काल शपथविधी सोहळ्यावेळी अमोल कोल्हे उपस्थित होते तर आज त्यांनी ट्विट करत मी शरद पवार यांच्यासोबत आहे असं म्हंटलं आहे.

यावर प्रश्न केला असता शरद पवार म्हणाले की, अजित पवार कोणी परके नव्हते, माझी मुलगी तीनदा तिथे गेली, त्यांनी काही चुकीचं काम केलं असं नाही.

शेवटी एकच तर काम केलं आहे, मतभिन्नता आहे. ही मतभिन्नता काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न एखाद्या सहकाऱ्याने केला म्हणुन त्यावर संशय हा कधी मी कधी व्यक्त करणार नाही असं शरद पवार म्हणाले आहेत.(Latest Marathi News)

तर अजित पवार म्हणजे पक्ष नाही असंही शरद पवार यावेळी म्हणाले आहेत. दोन तीन महिन्यात महाराष्ट्राचं राष्ट्रवादीसाठी चांगलं चित्र दिसेल असंही पवार यावेळी म्हणालेत.(Latest Marathi News)

Sharad Pawar News
Raj Thackeray: 'सुप्रिया सुळे उद्या केंद्रात मंत्री...', राज ठाकरेंना वाटतो बंडा मागे पवारांचा हात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.