Ajit Pawar
Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवार हे महाराष्ट्राचे अमिताभ बच्चन; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

Published on

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे अजित पवार यांना महाराष्ट्राचे अमिताभ बच्चन म्हणाल्या. शिंदे गटाचे मंत्री दिपक केसरकर यांनी अजित पवार यांना सरकारमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. यावर सुळे यांनी प्रतिक्रिया विचारली असता त्यांने मजेदार उत्तर दिले. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला जाहिरात राजकारणावरुन देखील टोला लगावला.  

अजित पवार यांनी सरकारमध्ये यावे ही आमची अपेक्षा आहे. ते कार्यक्षम नेते असून, त्यांच्या कामाचा फायदा राज्याला झाला पाहिजे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीत काय होतंय, हे सर्वांना माहिती आहे, असे शिंदे गटाचे मंत्री दिपक केसरकर म्हणाले होते, यावर देखील सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी सुप्रिया सुळे अजित पवार यांना अमिताभ बच्चन म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या,  "अमिताभ बच्चन सर्वच सिनेमात हवे असतात. त्यांच्या आवाज, फोटो, लूक आणि सही सुद्धा चालते. तसेच, अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत. त्यामुळे चुकीचं काय आहे.”

करोडो रुपयांच्या जाहिराती देणारे कोण-

राज्यात करोडो रुपयांच्या जाहिराती देणारे कोण आहेत याचा शोध मी आणि अजित पवार घेत आहोत. मात्र अजूनही असा हितचिंतक कोण सापडला नाही. असे हितचिंतक आपल्यालाही मिळाले पाहिजेत आणि पानभर करोडो रुपयांच्या जाहिराती पेपरला मिळाल्या तर आमचेही भले होईल आणि त्यांचेही भले होईल.

त्यामुळे अशा लोकांच्या शोधात आहोत. असे हितचिंतक सापडले तर आमचा नंबर त्यांना द्या, असा टोला सुप्रिया सुळे यांनी शिंदे सरकारला लगावला आहे.

आपण चेहर्‍यापेक्षा पॉलिसीवर का काम करत नाही असा सवाल करतानाच तुम्ही चेहर्‍याला मत देणार की पॉलिसीला मत देणार आहात. मला वाटते आपण पॉलिसीला महत्त्व दिले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.  

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे बेकायदा पोस्टर लागतात तेव्हा त्याच्या वेदना होतात असे स्पष्ट करतानाच तुम्ही कायदे बनवता आणि तुम्हीच ते तोडणार असाल तर ते दुर्दैव आहे, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी सरकारला खडसावले.

Ajit Pawar
Patanjali Foods: रामदेव बाबांची जादू कायम...14 नवे प्रोडक्ट लाँच करताच पतंजलीचे शेअर सुसाट

महिलांच्या बाबतीत सरकार अतिशय असंवेदनशील -


केंद्र व राज्य सरकार महिलांच्या बाबतीत अतिशय असंवेदनशील आहे. दिल्लीत महिला कुस्तीपटूंची केस ज्यापद्धतीने पोलिसांनी हाताळली हा पहिला मुद्दा आणि महाराष्ट्रात सातत्याने महिलांच्या विरोधात ज्या पद्धतीच्या घटना वाढत चालल्या आहेत त्याला सर्वस्वी राज्याचे गृहखाते जबाबदार आहे, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत केला.

दरम्यान, मरीन ड्राईव्ह येथील शासकीय वसतिगृहात घटनेतील पीडित कुटुंबीयांनी आजच भेट घेतली असून सरकारला लवकर यासंदर्भात पाऊले टाकण्याची विनंती करणार असल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar
Uniform Civil Code: 'समान नागरी कायद्या'पेक्षा 'लोकसंख्या नियंत्रण कायदा' आणा; शरद पवारांनी मांडली भूमिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com